A Guide On Sukanya  Yojana In Marathi

A Guide On Sukanya Yojana In Marathi

Spread the love

Sukanya Yojana In Marathi

सुकन्या समृद्धी योजना हि एक सरकारी योजना आहे . सरकारने हि योजना मुलींचे भविष्य सुखकर जावे ह्या साठी बनवली आहे . हि योजना केंद्र सरकारने बनवली आहे हि योजना प्रत्येक बँक मध्ये तसेच पोस्ट ऑफिस मध्ये सुद्धा उपलभद्ध आहे . आज आपण Suknya Yojana in Marathi  मध्ये माहिती घेणार आहोत .

ह्या योजने मध्ये सरकार दर वर्षी एक ठराविक व्याज दर आपण केलेल्या बचती वरती देते . हे व्याज दर बचत अकाउंट वर दिलेल्या व्याज दर हुन जास्त असते . ह्या योजने मध्ये आपण जमा केलेल्या रिकामे वर इनकम टॅक्स ची सूट मिळू शकते . मुलींच्या लग्न तसेच शिक्षण करीत हि योजना केंद्र सरकारने बेटी बचाव बेटी पढाव अंतर्गत आणलेली आहे .

ज्या लोकांना थोडी थोडी रक्कम आपल्या मुलीच्या लग्न साठी किंवा शिक्षणासाठी जमा करायची असल्यास हि योजना फायदेशीर आहे .  काही लोकांना स्टॉक मार्केट किंवा फिक्स्ड डिपॉजिट मध्ये रक्कम गुंतवायचे नसेल त्यासाठी हि योजना उपयुक्त आहे .

 स्टॉक मार्केट किंवा mutual fund मध्ये जोखीम खूप आहे आणि लोकांना ती टाळायची असल्यास सुकन्या समृद्धी हि योजना फायदेशीर आहे . जर एका कुटुंबात २ मुली असतील तर त्या २ नि मुली चे सुकन्या अकाउंट निघेल पण २ पेक्षा अधिक मुली असतील तर त्यांना जन्म प्रमाणपत्र आणि afedavit द्यावे लागेल. 

 

 

सुकन्या सुकन्या योजनेची वैशीष्ट्ये -

suknya yojana in marathi
  • ज्या मुलींचे वय १० ते त्या हुन कमी आहे त्या साठी हे अकाउंट आहे. त्यांचे आई किंवा वडील हे अकाउंट मुली सोबत जॉइंट खोलू शकतात .
  • जर व्यक्तीस २ मुली आहेत तर त्या २ नि मुली चे अकाउंट सुरु करू शकतात .
  • २५० रुपया पासून १५०००० /- ची लिमिट आहे . प्रत्येक वर्षी १५०००० परेंत रक्कम जमा करू शकते.
  • ह्या योजने मध्ये जमा केलेल्या रक्कम वर इनकम टॅक्स ची सूट आहे. इनकम टॅक्स सूट ची लिमिट १५०००० आहे.
  • वयाच्या १८ वर्ष पर्यंत ५० % रक्कम सुकन्या मधून काढू शकतो . आणि पूर्ण रक्कम २२ वर्ष नंतर काढू शकतो

सुकन्या अकाउंट च्या काही अटी

१. जेव्हा मुलीस १८ वर्ष पूर्ण होईल तेव्हा सुकन्या अकाउंट बंद करू शकतो . 

२. जेव्हा मुली चे लग्न २१ वर्ष च्या आदी होईल तेव्हा अकाउंट मध्ये रक्कम जमा करू शकत नाही . 

३. जर अकाउंट २१ वर्ष पूर्ण होण्या च्या आदी बंद करायचे असल्यास affedevit लिहून द्यावे लागेल कि मुलीचे वय १८ अर्श पेक्षा कमी नाही 

४. सुकन्या समृद्धी अकाउंट फक्त भारतीय नागरिक काढू शकतात . प्रवासी भारतीय नागरिक सुकन्या अकाउंट काढू शकत नाहीत . जर मुलगी चे सुकन्या अकाउंट असेल आणि तिचे लग्न झाल्या नंतर तिने परदेशी नागरिकतत्व घेतले असेल तर तिला सुकन्या समृद्धी अकाउंट वर व्याज मिळणार नाही . 

५. एका मुली च्या नावे एक च खाते खोलू शकता. 

६. खाते चालू केल्यापासून १४ वर्ष खातेधारक पैसे भरू शकतो . 

७. जर मुली ने २१ वर्ष पूर्ण होण्या आधी लग्न केले असेल तर खातेधारक अकाउंट चालू ठेवू शकत नाही .

सुकन्या योजना कोणत्या परीस्तितीत बंद करू शकतो

१. वयाची २१ वर्ष पूर्ण झाल्यावर आपण हे अकाउंट बंद करू शकतो . 

२. जेव्हा खातेधारकाचा मृत्यू झाल्यानंतर हे अकाउंट बंद होते आणि अकाउंट मधील रक्कम वारसधारकांना मिळते . 

३. जर आपणास हे अकाउंट बंद करायचे झाल्यास ५ वर्ष नंतर हे अकाउंट आपण बंद करू शकतो . पण जर खातेधारकास गंभीर आजार झाला असेल तर. 

४. जर आपणास हे अकाउंट कोणत्या कारणांनी बंद करायचे असल्यास ५ वर्ष नंतर हे अकाउंट बंद करू शकतो पण आपणास ह्या अकाउंट वर मिळणारे व्याज बचत अकाउंट प्रमाणे मिळेल

सुकन्या अकाउंट वर आपण रक्कम कशी जमा करू शकतो

१. बँक किंवा पोस्ट ऑफिस जिथे आपले खाते असेल तिथे आपण रक्कम ने डायरेक्ट जमा करू शकतो .
२. इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर ने आपण हे पैसे जमा करू शकतो .
३. demand draft ,चेक च्या माध्यमातून सुद्धा आपण पैसे जमा करू शकतो .

 

पैसे जमा करण्या संबंधी काही नियम

जर खातेधारकास सुकन्या अकाउंट एका शहरातून दुसऱ्या शहरात हस्तांतरित करायचे असल्यास ते हस्तांतरित होते .

 जर खातेधारकाचे पालकांना एका शहरातून दुसऱ्या शहरात वास्तव्य कारणाचे कारण व पुरावे द्यावे लागतील . सुकन्या अकाउंट हे एका शहरातून दुसऱ्या शहरात विना शुल्क हस्तांतरित होते .
सुकन्या अकाउंट हे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सुद्धा हस्तांतरित होते

सुकन्या समृद्धी साठी लागणारी कागतपत्रे

१. मुली चे आधार कार्ड .
२. मुली चे जन्म प्रमाणपत्र
३. पालकांचे आई किंवा वडील यांचे पॅन कार्ड , आधार कार्ड
४. मुलीचा फ़ोटो जर खूप लहान नसेल तर , पालकांचा फोटो
हे सर्व कागतपत्र आवश्यक आहेत .

सुकन्या समृद्धी चे फायदे
suknya yojana in marathi

१. } जर खातेधारकाने १००० महिना भरल्यास किती मिळणार मिळणारे व्याज ७. ६ %
१०००*१२ = १२००० प्रति वर्ष
१२०००*१५ = १८०००० पूर्ण रक्कम
मिळणारे व्याज ३ लाख २९ हजार
पूर्ण मिळणारी रक्कम = १८०००० + ३२९०००
= ५ लाख ९ हजार

२.} जर खाते धारकाने २००० रुपये महिना भरल्यास
२०००*१२ = २४०००प्रति वर्ष
२४०००*१५ = ३ लाख ६० हजार पूर्ण रक्कम
मिळणारे व्याज ६५८००० /-
पूर्ण मिळणारी रक्कम – १०,१८,००० /-

३.] जर खातेधारकाने महिना ३००० रुपये भरल्यास –
३०००*१२ = ३६००० प्रति वर्ष
३६००० रुपये १५ वर्ष भरल्यास होणारी रक्कम = ५४००००
मिळणारे व्याज ९८७०००/-
पूर्ण मिळणारी रक्कम – ५,४०,००० + ९,८७,००० = १५,२७,०००/-

४.] जर खातेदाराने महिना प्रति ४००० रुपये भरल्यास –
४०००*१२ = ४८००० प्रति वर्ष
४८००० रुपये १५ वर्ष भरल्यास होणारी रक्कम = ७,२०,०००
मिळणारे पूर्ण व्याज – १३,१६,००० /-
पूर्ण मिळणारी रक्कम – २०,३७,००० /- 

जर अटल पेन्शन योजने बद्दल माहिती हवी असल्यास ह्या लिंक वर क्लिक करा – ATAL PENSION YOGNA IN MARATHI

Manoj

I am a banker and personal finance manager. I have more than 7 years of experience in the banking industry.

This Post Has One Comment

Leave a Reply