All details About Mudra Loan In Marathi

All details About Mudra Loan In Marathi

Spread the love

केंद्र सरकारने हि योजना लहान व्यावसायिक याना मदत करण्यासाठी आणली आहे . Mudra laon च पूर्ण नाव Micro Units Development Refinance Agency २०१५ साली ह्या योजनेची सुरवात झाली . लोक मुद्रा कर्ज ची माहिती  मध्ये शोधात असतात त्या व्यक्ती ना हा ब्लॉग Mudra Loan In Marathi  फायदेशीर आहे 

लहान रक्कम व्यवसाय सुरु करण्यासाठी तसेच व्यवसाय वाढवण्यासाठी लोन च्या माध्यमातून प्रोसाहन देण्यासाठी हि योजना सुरु करण्यात अली आहे . केंद्र सरकार ला वाटत कि ह्या योजनेच्या माध्यमातून नवीन योजगार तसेच नवीन व्यवसाय सुरु होतील आणि बेरोजगारी कमी होईल . 

Mudra Loan येण्याचा आधी बँक लोण देताना mortgage तसेच guarantor ची डिमांड करत होते पण मुद्रा कर्ज मध्ये mortgage तसेच guarantor ची आवश्यकता नसते आणि बँक लोन प्रोसेस कमी वेळात करते .
मुद्रा लोन मध्ये १० लाख पर्यंत लोण ची सुविधा उपलब्ध आहे . Mudra Loan मध्ये कोणतीही लोन प्रोसससिंग फी नाही हे कर्ज कोणत्याही प्रोसससिंग फी तसेच अन्य फी मुक्त आहे .

MUDRA LOAN IN MARATHI

मुद्रा कर्ज चे प्रकार / Mudra Loan Types In Marathi

शिशु कर्ज – ह्या कर्ज प्रकार मध्ये बँक कर्जदाराला ५०००० पर्येंत कर्जाची सुविधा उपलब्ध करते ,ह्या कर्ज प्रकार सुरवातीचा सुरवातीच्या काळात म्हणजे व्यवसाय सुरु करण्या साठी तसेच व्यवसाय लहान प्रमाणात वाढवण्यासाठी देण्यायात येतो 


 किशोर कर्ज – ह्या कर्ज प्रकार मध्ये बँक कर्जदाराला पन्नास हजार ते पाच लाख पर्यंत कर्ज उपलब्ध करण्यात येते . ह्या कर्ज प्रकार मध्ये बँक ज्या लोकांचा सुरवाती पासून कोणता तरी व्यवसाय आहे अशा व्यक्तीना व्यवसाय वाढविण्या साठी उपलब्ध करते ,ह्या कर्ज चा कालावधी ५ वर्ष पर्यंत असतो आपणास कर्ज ५ वर्ष पर्यंत फेडायचे असते .

 तरुण कर्ज – ह्या कर्ज प्रकार मध्ये पाच लाख पासून दहा लाख पर्यंत कर्ज मिळतात . ह्या प्रकार मध्ये बँक कर्ज चा परतफेड कालवडी स्वतः त्यांच्या पोलिसी नुसार ठरवते . हे कर्ज प्रकार अशा लोकांना देण्यात येते जे त्यांचा बिसनेस एका मोठ्या लेवल पर्यंत वाढवण्याचा प्रयन्त्न करतात 

mudra loan in marathi in detail

बँक जे मुद्रा कर्ज देतात त्यांची नावे / Which Bank provide Mudra Loan

  • बँक ऑफ महाराष्ट्र
  • स्टेट बँक ऑफ इंडिया
  • बँक ऑफ इंडिया
  • बँक ऑफ बडोदा
  • पंजाब नॅशनल बँक
  • कॅनरा बँक
  • icici बँक
  • hdfc बँक
  • ऍक्सिस बँक
  • फेडरल बँक

मुद्रा लोण साठी लागणारी कागतपत्र/ Mudra Loan Documents In Marathi

documents

मुद्रा कर्ज साठी काही महत्वाची कागतपत्र लागतात आणि त्यांची पूर्तता करणे गरजेची असतात जर कागतपत्र अपूर्ण असतील तर कर्ज मिळत नाही . 

1. मुद्रा कर्ज अँप्लिकेशन फॉर्म
2. आयडेंटिटी प्रूफ – आधार कार्ड , ड्रायविंग licencee, वोटिंग कार्ड , पॅन कार्ड ह्या document मधील कोणतेही एक document .
3. रहिवासी कागतपत्र – आधार कार्ड , रेशनिंग कार्ड , वोटिंग कार्ड , light bill , पासपोर्ट , ह्या डोकमेण्ट मधील कोणतेही एक
4. it रिटर्न मागील ३ वर्ष .
5. बँक स्टेटमेंट ६ महिन्याचे
6. बॅलन्स शीट ३ वर्ष पर्यंत
7. पासपोर्ट साईझ फोटो
8. बिसनेस प्रूफ – व्यवसाय चालू असल्याचा धाकला , बिसनेस licencee.
9.जर अर्जधारक st /sc असेल तर त्यास प्रमाणपत्र सादर करावे लागेल .
10.कर्ज धारक जर कोणती मशीन अथवा सामग्री खरीदी करणार असेल तर त्यास त्याचे कोटेशन सादर करावे लागेल

मुद्रा कर्ज ची योग्यता / Mudra Loan Eiligibilty In Marathi

मुद्रा कर्ज ची काही अटी आहेत त्या पूर्ण असाव्या लागतात तरच मुद्रा कर्ज मिळते  खाली काही अटी आहेत त्या पूर्ण कराव्या लागतील
१. वय मर्यादा – ज्या व्यक्तीस कर्ज हवे आहे त्याचे वय १८ वर्ष ते ६५ वर्ष पर्यंत असावे
२. थकबाकी – कर्ज अर्जदार ची कोणतीही थकबाकी नसावी .
३. क्रेडिट स्कोर – सिबिल स्कोर हा ७५० च्या वर असावा .
४. व्यवसाय धारक असावा

मुद्रा कार्ड/ Mudra Card

मुद्रा कार्ड हे कर्जधारकांना देण्यात येते ज्या कर्जधारकांचे कर्ज मंजूर झाले आहेत अशा व्यक्तीस डेबिट कार्ड सारखे मुद्रा कार्ड देण्यात येते ह्या कार्ड मध्ये मुद्रा कर्जाची रक्कम टाकण्यात येते आणि कर्ज धारक आपल्या सोयीनुसार काढू शकतो .

मुद्रा कर्ज ची काही फायदे/ Benifits Of Mudra Loan In Marathi

१. ह्या कर्ज प्रकारात कोणतीही ग्यारंटी द्यावी लागत नाही .
२. ह्या कर्ज प्रकारात कमीत कमी रक्कम सुद्धा मंजूर होऊ शकते . जर कर्जधारकाची आवश्कयता १५००० हजार आहे तर त्यास ती रक्कम मिळू शकते 
३. मुद्रा कर्ज मध्ये कोणतीही प्रोसससिंग फी द्यावी लागत नाही .
४. सर्व बिगर कृषी व्यवसायांना कर्ज ची सुविधा उपलब्ध आहे .

मुद्रा कर्ज ची वैशिट्ये

१. मुद्रा कर्ज ऑनलाईन पद्धतीने सुद्धा मिळवता येऊ शकते .
२. मुद्रा कर्ज व्यवसाय सुरु तसेच भांडवल म्हणून , मशीन खरेदी , आधुनिकरणासाठी , तसेच दुसऱ्या गोष्टी साठी सुद्धा कर्ज मिळू शकते .
३. मुद्रा कर्ज नवीन किंवा जुन्या व्यवसायास सुद्धा मिळू शकते .
४. कर्ज परतफेड ३ वर्ष ते ५ वर्ष पर्यंत .

मुद्रा कर्ज कोणत्या कारणांसाठी मिळू शकते

१. व्यापारी कारणासाठी गाडी घेणे – माल वाहतूक करण्यासाठी गाडी घेणे जसे चार चाकी किंवा तीन चाकी, रिक्षा ,ट्रॅक्टर. प्रवासी वाहतूक करण्यासाठी वाहन घेणे जसे टॅक्सी , ओमानी व्हॅन .
२. छोटे व्यवसाय सुरु करण्यासाठी – सलून दुकान , मेडिसिन दुकान , गाडी दुरुस्ती दुकान , फोटोग्राफी दुकान , प्लम्बिंग दुकान . इत्यादी व्यवसाय सुरु करण्यासाठी मुद्रा कर्ज मिळू शकते .
३. कृषी जोड व्यवसाय करण्यासाठी – कुकुटपालन कारण्या साठी , शीतगृह उभारण्यासाठी , डेअरी किंवा फिशरी साठी तसेच अन्य कृषी उद्योग साठी मुद्रा कर्ज मिळू शकते .
४. व्यापारी आणि दुकानदारांसाठी व्यवसाय करण्यासाठी .

मुद्रा कर्ज कोण देऊ शकते /Who Give Mudra Loan

१. सर्व सरकारी बँक
२. नॉन बँक फायनान्स कंपनी
३. खाजगी बँक
४. स्मॉल बँक
५. Regional Rural Banks (RRBs)
६. Micro Finance Institutions

मुद्रा कर्जाची ऑनलाईन प्रक्रिया/Online Application of Mudra Loan In Marathi

online form in marathi
application form in marathi

मुद्रा योजनेची सरकारी वेबसाइट आहे त्या वेबसाइट मध्ये जाऊन तो फॉर्म डाउनलोड करावा व आपल्या नजीक च्या बँक मध्ये जमा करावा . आपण ऑनलाइन संपूर्ण प्रोसेस आज भागणार आहोत 

१. सगळ्यात पाहिलांदा मुद्रा कर्ज च्या अधिकारीक वेबसाईट वर लॉगिन करावे
२. होम पेज ओपन होईल आणि आणि त्या मध्ये शेवटी मुद्रा कर्ज चे प्रकार समोर दिसतील १. शिशु २. किशोर ३. तरुण ह्या पैकी तुमचा प्लॅन निवडावा .
३. मुद्रा कर्ज च्या ३ प्रकार मधील जो तुमि सिलेक्ट कराल त्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल
४. नवीन विंडो मधून अँप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करावा
५. डाउनलोड अँलिकेशन फॉर्म ची प्रिंट काढावी आणि ती संपूर्ण भरावी
६. फॉर्म संपूर्ण नीट भरावा आणि त्या फॉर्म सोबत तुमची कागतपत्र वरील दिलेल्या प्रमाणे जोडावी व बँक मध्ये द्यावी .

Mudra Loan Subsidy

मुद्रा कर्ज मध्ये गव्हर्मेंट कोणतेही सबसिडी देत नाही . सरकारने त्या बद्दल कोणतीही घोषणा केलेली नाही . सरकार फक्त कमी व्याज दारा मध्ये कर्ज वितरित करते . आणि लहान व्यावसायिक व्यक्तींना कर्ज देते .

अटल पेन्शन योजने बद्दल माहिती हवी असल्यास ह्या लिंक वर क्लिक करा – अटळ पेन्शन योजना इन मराठी 

Manoj

I am a banker and personal finance manager. I have more than 7 years of experience in the banking industry.

Leave a Reply